ravindra chavan  Saam tv
महाराष्ट्र

मुंबईतील ऐतिहासिक स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास होणार; रविंद्र चव्हाणांनी दिली महत्त्वाची माहिती

ravindra chavan news : मुंबईतील ऐतिहासिक स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या विषयाची सखोल माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली.

Saam Tv

स्वदेशी मार्केटला 117 वर्षे पूर्ण

मुंबईच्या प्रसिद्ध कापड बाजारातील 'स्वदेशी मार्केट'ची देशभर चर्चा

'स्वदेशी मार्केट'चा पुर्नविकास होणार असल्याची भाजप नेते चव्हाणांनी दिली माहिती

स्वदेशी मार्केटला मंगळवारी 117 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वदेशी मार्केटच्या काळबादेवी परिसरात इंग्रज सरकार विरोधात स्वदेशीचा नारा दिला होता. त्यावेळी क्रांतिकारी बाबू गेनू सैद यांनी प्राणांची आहुती दिली. क्रांतिकारक बाबू गेनू सैद यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीसाठी बलिदान दिलं. विदेशी कपड्यांच्या ट्रकला रोखला, त्यांचे हे बलिदान स्वदेशीसाठी प्रेरणा आणि दिशा देते. त्यांचा हा जाज्ज्वल्य वारसा मुंबईच्या प्रसिद्ध कापड बाजारातील 'स्वदेशी मार्केट' ही संस्था गेल्या ११७ वर्षांपासून अभिमानाने जपत आहे. या ऐतिहासिक स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास होणारच, अशी खात्री भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी दिली.

पुनर्विकास प्रक्रियेत स्वदेशी मार्केटच्या कोणत्याही सदस्याला त्रास होणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांच्या वतीने ग्वाही देतो, असे भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले. मुंबईतील काळबादेवी स्थित स्वदेशी मार्केटला तब्बल 117 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला चव्हाण देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले.

रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाला 12 वर्षे पूर्ण होताहेत. या संपूर्ण 12 वर्षांत देशाचा विकास करताना 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' हे तत्व मोदी यांनी बाळगले. देशात जे जे उत्पादित होते, ते देशभर आणि जगाच्या मार्केटमध्ये कसे पोहचेल यासाठी एनडीए सरकार प्रयत्नशील राहिले आहे. दृष्टिकोन डोळ्यांसमोर समोर ठेऊन सरकार काम करत असते. त्यामुळे राज्याच्या विकासामध्ये आता कोणतीही अडचण असणार नाही. तसेच राज्य विकासाच्या मार्गावर कधीही मागे वळून पाहणार नाही'.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, विकासाभिमुख रणनीती वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झाला, असे करणे आधी कुणालाही शक्य झालं नाही. महाराष्ट्रातही विकासाची गंगा वाहतेय. त्यामुळे या विकासाच्या प्रवाहात स्वदेशी मार्केटचा देखील पुनर्विकास होणार याबद्दल कोणतेही दुमत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Benefits: रोज फक्त 30 मिनिटे चालण्याची सवय लावा अन् हेल्दी आयुष्याची सुरुवात करा

Sangli Waterfall: विकेंडला भिजण्याचा प्लान करताय? सांगलीत लपलाय हा एक धबधबा, नक्की फिरून या

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंग गड बंद; भाविकांना पायथ्याशीच करावी लागली नवसपूर्ती

अनधिकृत बाईक-टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले, आता 'हे' प्रमाणपत्र अनिवार्य, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

घरच्या घरी करा पार्लरसारखा हेअर स्पा; केस दिसतील स्मूथ, सिल्की आणि शायनिंग

SCROLL FOR NEXT