Pravin Darekar  Saam Tv
महाराष्ट्र

...तरीही राज ठाकरे एका चौकटीत बोलतील असं वाटत नाही: प्रवीण दरेकर

साम टिव्ही ब्युरो

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा होणार आहे. मनसेकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे, सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला (chief Raj Thackeray Rally) आधीच परवानगी देणे आवश्यक होतं. मात्र, मुद्दामहून विलंब करण्याचं काम केलं जात आहे. परवानगी द्या, अथवा नका देऊ. प्रत्येक सभा होण्याआधी जातीय तेढ निर्माण होणार नाही अशा अटी-शर्ती असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांच्या सभेवर निर्बंध लादले तरी, राज ठाकरे एका चौकटीत बोलतील असं वाटत नाही, असं दरेकर यांनी सांगितलं.

शिवसेनेवर डागली तोफ

शिवसेनेसोबत युती तोडायची कशी या प्रश्नामुळं राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा विचार मागे पडला, असं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. याबाबत दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसंदर्भात काय बोलणी झाली होती हे माहिती नाही. आताच्या परिस्थितीमध्ये दगडापेक्षा वीट मऊ असं त्यांना वाटलं असेल. त्या भावनेतून अशा प्रकारची भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली असावी. किमान राष्ट्रवादीचे नेते आपल्या मतदारसंघांत विकासकामांसाठी आग्रही असतात. परंतु शिवसेनेला ना विचारधारा, ना विकासाच्या बाबतीत ते आग्रही असतात. आपल्या आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामे होत नाहीत. पण शिवसैनिकांचा विकासासंदर्भात आग्रह असतो. पण तोही पूर्ण होत नाही, अशी टीका दरेकर यांनी केली.

'राणा दाम्पत्याचा छळ केला जातोय'

यावेळी राणा दाम्पत्यावर झालेल्या कारवाईवरूनही दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सरकार सूडभावनेने पेटलेले आहे. भाजपचे नेते, कार्यकर्त्यांनी काहीही केले नसताना, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. अटक करण्यासारखा गुन्हा नसताना देखील अटक केली जाते. अशा प्रकारची छळवणूक महाविकास आघाडीकडून सुरू आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. राणा दाम्पत्य ज्या पद्धतीने सरकारवर आसूड ओढत आहे, सरकारचे गैरव्यवहार, भ्रष्टाचार ज्या पद्धतीने बाहेर काढत आहेत, त्यांच्याकडून जी टीका केली जात आहे, ती या सरकारला सहन झाली नाही. त्यामुळेच विरोधात बोलेल, टीका करेल त्याचा आवाज आम्ही दाबून टाकू, असा एककलमी कार्यक्रम त्यांचा सुरू आहे. राणा दांपत्याचाही अशाच प्रकारे छळ केला जात आहे, असेही दरेकर म्हणाले.

Edited By - Nandkumar joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT