Pankaja Munde on Mumbai Home  Saam tv
महाराष्ट्र

Panjaka Munde News: मराठी म्हणून मलाही मुंबईत घर नाकारलं होतं; पंकजा मुंडे यांनी सांगितला अनुभव

Pankaja Munde on Mumbai Home: मराठी म्हणून मलाही मुंबईत घर नाकारलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

Satish Daud

Pankaja Munde on Mumbai Home

मुंबईतल्या मुलुंड भागात एका मराठी महिलेला भाड्याने घर देण्यासाठी नाकारण्यात आलं. यावरुन मोठा संताप व्यक्त केला जात असून सर्वच स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. मराठी म्हणून मलाही मुंबईत घर नाकारलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाल्या पंकजा मुंडे

शासकीय बंगला सोडल्यानंतर जेव्हा मुंबईत मी घर शोधायला गेले, तेव्हा मला देखील मराठी म्हणून घर नाकारण्यात आलं होतं, असा अनुभव पंकजा मुंडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत असे प्रकार घडत आहेत, असं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जेव्हा मी मुंबईत घर शोधत होते, तेव्हा मलाही असा अनुभव आला. मराठी माणसांना (Mumbai News) आम्ही जागा देत नाही हे मीही ऐकले आहे, याचा पुनरुच्चारदेखील देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून मन खिन्न होते. मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीने जो व्हिडीओ टाकला, तो संताप आणणारा आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मराठी महिलेला घर नाकारणाऱ्याला पोलिसांचा दणका

मुंबईच्या मुलंड भागात तृप्ती देवरुखकर ही मराठी महिला आपल्या ऑफिससाठी भाड्याने जागा शोधायला गेली होती. यावेळी आम्ही मराठी लोकांना व्यावसायासाठी जागा देत नसल्याचं एका सोसायटीच्या सचिवाने तृप्ती देवरुखकर यांना सांगितलं. या सचिवाला तृप्ती यांनी नियमांची कॉफी मागितल्यानंतर त्याने तृप्ती यांना अरेरावी देखील केली.

तृप्ती यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती एका व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर दिली. हा व्हिडीओ समोर येताच मराठी माणसांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. राज ठाकरे यांच्या मनसेने सोसायटीत जाऊन सचिवाला चांगलाच इंगा दाखवला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील या घटनेची दखल घेत सोसायटीच्या सचिवावर गुन्हा दाखल केला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Maharashtra Live News Update: शिवसेनेबरोबर आता रायगड जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी विरोधात तोंड उघडले

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT