Pankaja Munde Speech Saam tv
महाराष्ट्र

Pankaja Munde Speech: 'माझा एवढा मोठा बाप राहिला नाही अन् आता...'; पंकजा मुंडे बोलता बोलता रडायला लागल्या

Pankaja Munde Speech: पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला

विनोद जिरे

Pankaja Munde News: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. 'माझा एवढा मोठा बाप राहिला नाही. आता त्यांच्यापेक्षा लहान माणसांकडून काय अपेक्षा करू, असं म्हणत पंकजा मुंडे भावुक झाल्या. (Latest Marathi News)

'माझं राजकारण केवळ समाजाचं भलं करण्यासाठी आहे. मला परळीतून पराभव पत्करावा लागला. मला जर भूमिका घ्यायची असेल, तर मी पत्रकार मित्रांना बोलावून भूमिका घेईन. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भूमिका मांडणार नाही. पंकजा मुंडे राजकारणात भूमिका घेईल, ती छातीठोकपणे घेईल. अनेक लोक निवडणुका हरले, मात्र त्यांना संधी दिली', असे पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.

'माझा नेता अमित शहा आहे. मी त्यांची भेट घेणार आहे. त्यांना मी मनमोकळं बोलणार आहे. मी रडगाणं गाणारी नाही. तुमचं प्रेम, तुमची दशा आणि तुमचं प्रेम यावरचं माझं राजकारण असणार आहे. माझ्या जीवनात संयमाशिवाय काहीच नाही. माझा एवढा मोठा बाप राहिला नाही. आता त्यांच्यापेक्षा लहान माणसांकडून काय अपक्षे करू. तुम्ही धीर धरा, असं म्हणत पंकजा मुंडे भावुक झाल्या.

'आयुष्यात निवडणुकीचे अपयश कधीच माझ्या जिव्हारी लागलं नाही. मात्र, पुन्हा या वैद्यनाथ कारखान्याला पूर्वीसारखं वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करायचं आहे. माझ्या भूमिका कुणाच्याही आडून असणार नाही. सत्य हे सूर्यासारखं आहे. मी माझ्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर माझ्या मनात काय आहे हे तुमच्यासमोर बोलणार आहे. कुणाला काही वाटो, कुणी काही अर्थ काढो, मात्र मी कुणासमोर कधी झुकणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

SCROLL FOR NEXT