bjp leader pankaja munde  saam tv
महाराष्ट्र

नाराजीच्या चर्चेवर पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या; डोळ्यांत अश्रू अन् संघर्षाचा इशारा

तो संघर्ष तुमच्या लेकीच्याही वाट्याला आला आहे, पंकजा मुंडे म्हणाल्या....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड : माझी मीडियाला विनंती आहे, पुढे कोणत्याही आमदारांची यादी आली तर कृपया माझं नाव चालवू नका, मी तुमच्या पाया पडते. मी आता २०२४ च्या तयारीला लागली आहे. पंकजा नाराज आहे, नाराज आहे, कशाला नाराज आहे? कुणावर नाराज आहे? दसरा मेळाव्याला तुम्ही आला नाहीत, तर मी नाराज होईल. मी नाराज नाही. मी नाराज का होऊ? हे काय घरगुती भांडण आहे का नाराज व्हायला, हे राजकारण आहे.

मोठ्या मोठ्या लोकांना राजकारणात संघर्ष करावा लागला आहे. तो संघर्ष तुमच्या लेकीच्याही वाट्याला आला आहे. योग्य वेळेची वाट बघा, अशी गर्जना माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर आयोजित मेळाव्यात केली. (Pankaja Munde speech at bhagwan gadh melava)

दसऱ्याच्या मुहूर्तावर बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात बोलत होत्या. खासदार प्रीतम मुंडे यांनी रॅलीला सुरुवात केली आहे. बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन गोपीनाथगड ते भगवानभक्ती रॅलीला सुरुवात केली. मी संघर्ष कन्या आहे, माझा संघर्षाचा वारसा आहे, मी संघर्ष करणार.

जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालं आहे. त्यामुळे संघर्ष हा प्रत्येकाला आहे. गोपीनाथ मुंडेंची मी लेक आहे. त्यामुळे संघर्ष मला नवीन नाही. संघर्ष मी नाकारणार नाही. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या भाषणात संघर्षाचा उल्लेख केला मात्र त्यांचा रोख कुणावर? हा प्रश्न अता उपस्थित होत आहे.

मुंडे साहेबांना देखील संघर्ष चुकला नाही. ज्या पक्षात कुणीही जात नव्हतं त्या पक्षाचं कमळ घेऊन त्यांनी पक्ष वाढवला. 40 वर्षांच्या आयुष्यात केवळ त्यांना साडेचार वर्षांचीच सत्ता मिळाली, याची आठवण पंकजा मुंडे यांनी करुन दिली.व्यक्ती श्रेष्ठ नाही, संघटन श्रेष्ठ आहे. मी हा नियम पाळते. पक्षातील सर्वांना हा नियम लागू आहे. मीडियाला मी हात जोडून विनंती करते पंकजा मुंडे नाराजीची बातमी करु नका. मी आता 2024 च्या तयारीला लागली आहे,असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.मी पदर पसरून कुणाकडे काही मागायला जाणार नाही.

2024 च्या तयारीला लागा. मोठ्या प्रमाणावर काम करु आणि स्वाभीमानाने आपलं राज्य तयार करु. त्यामुळे आपआपल्या भागात जाऊन कामाला लागा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.मेळावा म्हटलं की टीका होते, चिखलफेक होते. पण आमचा हा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कधीच कोणाविषयी वाईट किवा खालच्या पातळीवरचे भाष्य केले नाही, ते आमच्या रक्तातच नाही,असंही पंकजा म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT