nilesh rane Sharad pawar saam tv
महाराष्ट्र

Nilesh Rane Tweet On Sharad Pawar: औरंगजेबाशी तुलना! शरद पवारांबद्दल बोलताना निलेश राणेंचा तोल सुटला; ट्विट व्हायरल..

Sharad Pawar: देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांची सध्याची परिस्थिती चिंता वाटावी अशी असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते.

Gangappa Pujari

Nilesh Rane Tweet On Sharad Pawar: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांची सध्याची परिस्थिती चिंता वाटावी अशी असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते.

पवारांच्या याच वक्तव्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली असून शरद पवार यांची थेट औरंगजेबाशी तुलना केल्याने नवा वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (Maharashtra Political News)

याबाबत अधिक माहिती अशी की, देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी अशी परिस्थिती सध्या देशात आहे. ख्रिश्चन समाजाच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होत आहेत, तर मुस्लिमांच्या विषयी लोकांच्या मनात जाणीवपूर्वक कटुता निर्माण केली जात आहे, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा होत असून विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. शरद पवार यांच्या याच वक्तव्यावर टीका करताना भाजप (BJP) नेते निलेश राणे यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. ज्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

काय आहे निलेश राणे यांचे ट्विट...

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांना ट्विटरवरुन लक्ष करताना निलेश (Nilesh Rane) राणे यांनी “निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार” अशा शब्दात शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांच्या या ट्विटला राष्ट्रवादीचे नेते काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

SCROLL FOR NEXT