CM devendra fadnavis 
महाराष्ट्र

भाजपला मोठा झटका! नागपूरमधील बड्या नेत्याचा थेट राजीनामा; पक्ष सोडताना सांगितले मोठे कारण

Girish Vyas Resignation : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजपमधील नाराजी उघड झाली आहे. सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार गिरीश व्यास यांनी पक्षाच्या पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

Namdeo Kumbhar

Girish Vyas resigns from BJP in Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे भाजपच्या अंतर्गत गोटातील असंतोष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाने सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात मोठी बंडखोरी पाहायला मिळत आहे. बंडखोर उमेदवार अनिल सोले यांचा अर्ज कायम राहिल्याने कोहळेंच्या अडचणी आधीच वाढल्या होत्या, त्यातच आता भाजपचे जुने-जाणते नेते, माजी आमदार आणि संघाच्या जवळचे मानले जाणारे गिरीश व्यास यांनी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हा भाजपला मोठा धक्का दिला आहे.

"कानामागून आले आणि तिखट झाले" - गिरीश व्यास यांचा रोखठोक संताप

तिकीट वाटपावरून जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचा प्रत्यय या निमित्ताने आला आहे. "सुधाकर कोहळे कार्यकर्ते असतील, तर आम्हीही कार्यकर्ते आहोत. पक्षात अनेकजण कानामागून आले आणि तिखट झाले," अशा शब्दांत गिरीश व्यास यांनी आपली चीड व्यक्त केली. उमेदवारी देताना पक्षाने जुन्या नेत्यांना विश्वासात घेतले नाही आणि निष्ठावंतांना डावलले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सामान्य कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि वरून लादले जाणारे निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघ मुख्यालयाजवळच बंडखोराचे रणसंग्राम :

या बंडखोरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनिल सोले यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ थेट बडकस चौकात करण्यात आला. हे संघ मुख्यालया अगदी जवळ आहे. ज्या कार्यालयातून कधीकाळी भाजपची रणनीती ठरत होती, त्याच कार्यालयाची जागा भाजपचे राजीनामा दिलेले माजी आमदार गिरीश व्यास यांनी सोले यांच्या प्रचारासाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे संघ मुख्यालयाच्या जवळ आता बंडखोराची रणनीती आखली जाणार हे स्पष्ट झाले आहे.

आम्ही मागे हटणार नाही - अनिल सोले आक्रमक

आमचं ठरलंय, कुणीही बसवण्याचा प्रयत्न केला तरी बसणार नाही, अशा मिश्कील आणि आक्रमक वाक्याने अनिल सोले यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. माघार घेण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावत, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि संयुक्त विर्भाचे माजी आमदार प. बच्चराज व्यास यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आपण रिंगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर नसून पसंती क्रमाची आणि सुशिक्षित मतदारांची आहे. शिक्षण, सहकार आणि विविध क्षेत्रांत आपण केलेल्या कामामुळे सुज्ञ जनता, प्राध्यापक आणि शिक्षकवर्ग आपल्या पाठीशी असल्याचे सांगत, येत्या २१ तारखेला निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास सोले यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Cold Water : सकाळी उठताच थंड पाणी पिताय? सवय पडेल महागात, ५ गंभीर दुष्परिणाम वाचून हैराण व्हाल

Diwali Holidays : दिवाळीच्या सुट्टीत मुलांना कसं ठेवाल व्यस्त? जाणून घ्या ६ भन्नाट उपाय

Abhijeet Dipke : "नरेंद्र मोदींना युवकांची भीती वाटते तर मग खुर्चीवर..."; दीपकेंचा संतप्त प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा भयानक प्रकोप! कोकणात उष्णतेचा इशारा; तर 'या' जिल्ह्यांत धो-धो पावसाचा हायअलर्ट

SCROLL FOR NEXT