Eknath shinde And Devendra fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मंत्रीमंडळ विस्तार लवकरच, महिला नेतृत्वाला मिळणार संधी; भाजपा मंत्र्याचे मोठे विधान

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेणार असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सुचक विधान भाजपा मंत्र्यांनी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girish Mahajan: शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत येवून सहा- सात महिने उलटून गेले आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने इच्छुकांमध्ये धुसपुस सुरु झाल्याची चर्चा समोर येवू लागली आहे. राज्याच्या लांबत चाललेल्या मंत्रिमंढल विस्तारावर आता गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा केला आहे.

ज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून महिला नेत्यांची वर्णी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Girish Mahajan)

याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. यावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे तसेच अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधत मंत्रिमंडळात महिला नाही असे विधान केले होते. यावर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्यामध्ये त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेणार असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सुचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारात महिला नेत्यांना संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन..

"मंत्रिमंडळात महिला नाही म्हणून त्यांचा आवाज दाबणं असं म्हणणं चुकीच आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना मोठ्या प्रमाणात पद मिळतील त्यामुळे महिलांची दिशाभूल करू नका,"अशी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याचबरोबर "तुम्हीही महिलांच्या प्रश्नावर आवाज उचला, तुम्हाला कोणी अडवलं आहे, त्याला राजकीय वळण लावू नका तुमची ही ती जबाबदारी आहे," असा टोलाही आदित्य ठाकरेंना (Aditya Theckeray) त्यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT