Chandrashekhar Bavankule Love Story Saam TV
महाराष्ट्र

Chandrashekhar Bavankule Love Story : चंद्रशेखर बावनकुळेंची 'प्यारवाली लव्ह स्टोरी'; प्रेमविवाहानंतर कठीण काळात रिक्षाही चालवली

Chandrashekhar Bavankule News : एखाद्या सिनेमाच्या कथेप्रणाने बावनकुळे यांची लव्हस्टोरी आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या धारधार वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. विरोधकांवर तुटून पडणारे बावनकुळे आज वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत.

नेहमी राजकीय घडामोडींवर बोलणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सर्वांसोबत शेअर केल्या आहेत. 'सरकारनामा'वरील एका मुलाखतीत बावनकुळे यांनी त्यांचा लग्नाचा किस्सा सांगितला. एखाद्या सिनेमाच्या कथेप्रणाने बावनकुळे यांची लव्हस्टोरी आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लग्नाची गोष्ट अनेकांना माहित नसेल. तेही आपल्या प्रेम विवाहाबाबत कधी उघडपणे बोलताना दिसलेले नाहीत. मात्र सरकारनामाच्या विशेष मुलाखतीत त्यांनी दिलखुलासपणे आपल्या लव्ह मॅरेजबद्दल सांगितलं आहे.  (Political News)

आंतरजातीय प्रेमविवाह

चंद्रशेखर बावनकुळे आणि पत्नी ज्योती बावनकुळे 'कयामत से कयामत तक'सिनेमा पाहायला गेले होते आणि तिथेच त्यांचं सूत जुळलं. त्यानंतर दोघांनी घरच्यांचा विरोध असूनही प्रेमविवाह केला. मात्र यानंतर त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या. आंतरजातीय विवाह केल्याने दोघांच्याही घरचे नाराज होते. (Latest News)

अडीच वर्ष रिक्षा चालवली

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वडिलांनी तर त्यांना घराबाहेर काढलं होतं. या परिस्थितीत त्यांनी कोराडी ते नागपूर अशी रिक्षा देखील चालवली. जवळपास दोन-अडीच वर्ष त्यांनी रिक्षा चालवली. मात्र दोघांच्याही प्रेमाखातर घरच्यांना त्यांना पुन्हा बोलावून घेतलं. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची कारकीर्द अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT