भाजपची जन आशीर्वाद यात्रा नसून जन अपमान यात्रा; महेश तपासे यांची टीका राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

भाजपची जन आशीर्वाद यात्रा नसून जन अपमान यात्रा; महेश तपासे यांची टीका

अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - जन सामान्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याने केंद्र सरकारचे मंत्री गावात जाऊन जन आशीर्वाद   काढत आहेत. लोकांची दिशाभूल करत आहेत. ही तर जन आशीर्वाद   यात्रा नसून जन अपमान यात्रा आहे अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे आणि जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी केली.अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

२०१४ नंतर सत्तेत आलेल्या भाजप केंद्रात सत्तेत आली. तेव्हा लोकांना त्यांचे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मात्र सात वर्षात कुठलेच प्रश्न सोडवता आले नाही. उलट महागाई आणि बेरोजगारी वाढली. त्यामुळे आता आपले अपयश लपविण्यासाठी केंद्रीय मंत्री गावागावात जाऊन जन आशीर्वाद  यात्रा काढत आहेत.

हे देखील पहा -

पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. डिझेलचे दरही प्रती लीटर शंभर वर पोहोचले आहेत. गॅसचे दर ९०० रुपयांवर गेले आहे. उज्वला योजनेचा बोजवारा उडाला आहे. महिलांना गॅस खरेदीसाठी पैसेच शिल्लक नाही, महिलांचे आश्रू केंद्र सरकारला दिसत नाहीत. सरकार इंधनाचे दर वाढवून पैसा गोळा करत आहे. इंधन दरवाढ संदर्भात एकही मंत्री जन आशीर्वाद यात्रेत बोलायला नाही. त्यामुळे ही जन अपमान यात्रा असल्याचे तपासे यांनी यावेळी म्हटले.

 दरवर्षी, २ कोटी रोजगार निर्मिती करु अशी घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात रोजगार निर्मिती झाली नाहीच, उलट साडे सात कोटी लोकांचे रोजगार गेले. करोनाच्या पार्श्वभुमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्राने २० लाख कोंटीचे पॅकेज जाहीर केले, त्याचे काय झाले कळलेच नाही. जिएसटीचे सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्रातून मिळते. मात्र राज्याला जिएसटीचा हक्काचा हिस्सा द्यायला केंद्र सरकार तयार नाही, राज्याला लसी देखील वेळेवर दिल्या जात नाहीत त्यावर भाजपचे नेते बोलायला तयार नाहीत केंद्रसरकारचे अपयश लपविण्यासाठीच ही जन आशीर्वाद  यात्रा काढली असल्याची टिका तपासे यांनी केली.

कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी राज्यसरकार विवीध उपाययोजना करत आहेत. लोकांचे जीव धोक्यात येऊन नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आणि भाजपचे नेते लोकांची गर्दी करून फिरत आहेत. एकीकडे करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकार देते आणि दुसरीकडे भाजपचे नेते लोकांना एकत्र करून फिरत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी यावेळी केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT