K Chandrashekhar - Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Solapur Political News : सोलापुरात भाजपला मोठं खिंडार; पदाधिकारी सामूहिक राजीनामे देत बीआरएसमध्ये प्रवेश करणार

BRS in Solapur : भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या 25 पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Solapur News :

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने सोलापुरात भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून, ते आता बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोलापूरचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यानं त्यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला होता. आता त्यांनी सोलापुरात भाजपला मोठा धक्का दिला आहे. (Latest News)

भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या 25 पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. आता हे सर्व पदाधिकारी आज सकाळी 11 वाजता बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे पदाधिकारी काल रात्रीच हैदराबादला रवाना झाले असून,मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

आगामी विधानसभा,लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. (Political News)

काही दिवसांपूर्वीच दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध सरपंचांसह ३५० जणांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३८ गावातील विद्यमान सरपंच, १२ माजी सरपंच, १२ ग्रामपंचायत सदस्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राहुल गांधी खऱ्या संसदेत पंतप्रधान होऊ शकत नाहीत'; अमित शाहांनी काँग्रेसला डिवचलं

मोबाईलमधून सिम कार्ड काढल्यास व्हॉट्सॲप चालणार का? जाणून घ्या सविस्तर

लग्नात अंतरपाट का धरतात? नवरा-नवरीच्या मध्ये हा पडदा का असतो? जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्हा बँकेचा उद्या फैसला! विखे-थोरात विरुद्ध लंके गटाच्या प्रतिष्ठेची लढाई

Fixed Deposit : तुम्हाला एफडी करायचीय? या बँक योजनेतून मिळतोय दमदार परतावा, जाणून संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT