Bawankule On Dhairyasheel Mohite Patil  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया

Dhairyasheel Mohite Patil: "पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी असा राजीनामा देणं योग्य नव्हतं, मात्र त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि जनता मोदींच्या पाठीशी आहे", असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

Bawankule On Dhairyasheel Mohite Patil

ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना माढ्यात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने अकलुजचे भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

दरम्यान, मोहिते पाटील यांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी असा राजीनामा देणं योग्य नव्हतं, मात्र त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि जनता मोदींच्या पाठीशी आहे", असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे, आम्ही कोठेही कमी पडलो नाही. त्यांची मान, प्रतिष्ठा ठेवण्याचा आम्ही कायम प्रयत्न केला आहे, असं म्हणत बावनकुळे यांनी राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली.

रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषद आमदारकीच्या राजीनाम्याबाबत मला काही बोलले नाहीत. त्यांची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे. ते आमच्या सोबत राहतील. शरद पवारांनी टाकलेला हा डाव वगैरे काही नाही. आमच्याकडे दररोज हजारोंनी पक्षप्रवेश होत आहेत, असंही बावनकुळे म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदी हे आरएसएसच्या मानगुटीवरील भूत असून ते विरोधकांना संपवायला निघाले, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. जेव्हा विरोधक मोदींचे आई-वडील काढतात, शिव्या देतात. तेव्हा समजून जायचं मोदी अगली बार ४०० पार होणार आहेत. पायाखालची वाळू सरकल्यानंतर अशी वक्तव्यं येतात, असं बावनकुळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update : आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

SCROLL FOR NEXT