Anil Sole latest news 
महाराष्ट्र

भाजपला मोठा धक्का, उमेदवारी नाकारल्याने गडकरींचे खंदे समर्थक बंडाच्या तयारीत, पदवीधरमध्ये मोठा भूकंप

Anil Sole latest news : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार अनिल सोले अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर होताच पक्षात मोठ्या बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने सुधाकर कोहळे यांना आज अधिकृत उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले बंडाच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. या शक्यतेमुळे नागपूर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

उमेदवारी नाकारल्याने सोले नाराज?

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपमधून सुधाकर कोहळे आणि अनिल सोले हे दोघेही प्रबळ दावेदार होते. अनिल सोले यांनी तर सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवातही केली होती. मात्र, भाजपने आज अखेर सुधाकर कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गेल्या निवडणुकीतही भाजपने अनिल सोले यांना ऐनवेळी डावलून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. आता सलग दुसऱ्यांदा डावलले गेल्यामुळे अनिल सोले यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अनिल सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि सहकारी मानले जातात. त्यांनी नागपूरचे महापौरपदही भूषवले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कोहळेंचे अभिनंदन

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या नागपूर दौऱ्यावर असून, उमेदवारी जाहीर होताच सुधाकर कोहळे यांनी त्यांचे शासकीय निवासस्थान 'रामगिरी' येथे जाऊन भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोहळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

"सोले माझे गुरू, नाराजी नाही" – सुधाकर कोहळे

उमेदवारी मिळल्यानंतर बोलताना सुधाकर कोहळे म्हणाले, "मी गेल्या ३५ वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षाने वर्षभरापूर्वीच मला नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती आणि अलर्ट केले होते. वर्षभरात आम्ही जोरदार नोंदणी केली आहे. माजी आमदार अनिल सोले हे माझे गुरू आहेत आणि मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्यांची कोणतीही नाराजी नाही आणि गेल्या वेळच्या चुका सुधारून ही जागा आम्ही निश्चित जिंकू."

काँग्रेस विरुद्ध भाजप थेट सामना

दुसरीकडे, काँग्रेसने या मतदारसंघातून अभिजित वंजारी यांना दुसऱ्यांदा मैदानात उतरवले आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी विरुद्ध भाजपचे सुधाकर कोहळे अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, अनिल सोले यांनी खरोखरच अपक्ष अर्ज भरल्यास भाजपची ही बंडखोरी पक्षाला महागात पडू शकते आणि निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवरच मारली उडी! पत्नीसोबत पुढे काय झालं? व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ; युगेंद्र पवारांचा अजित पवारांच्या भूमिकेवरून मोठा दावा

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

SCROLL FOR NEXT