vijay taad, sangli, bjp, corporator vijay taad saam tv
महाराष्ट्र

Vijay Taad News: भाजप नगरसेवकाची दिवसाढवळ्या गाेळ्या झाडून हत्या, कार अडवली अन्... सांगोला रस्त्यावर थरार

BJP News: अल्फोंसो स्कूल जवळ घडली घटना.

विजय पाटील

Sangli Crime News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विजय ताड (corporator vijay taad) असे भाजपा नगरसेवकाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

ताड यांची चार चाकी वाहन अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गाेळ्या झाडल्या. जत (jat taluka) येथील सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूल जवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी तसेच नगरसेवकाच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली.

हल्लेखाेर पसार

या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोणी केला हे सध्या तरी समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सांगली एसपी जतकडे रवाना

ताड समर्थकांची घटनास्थळी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली (Sangli SP basavaraj teli) देखील जतकडे रवाना झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Charan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर राम चरणच्या बॉडीगार्डची चर्चा; उत्साही चाहत्याला एका झटक्यात बाजूला केलं, 'केविन कुंटा' आहे तरी कोण?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

SCROLL FOR NEXT