Kavathe Mahankal Nagar Panchayat President Election, Sindhutai Gavde, MP Sanjaykaka Patil, rohit patil  saam tv
महाराष्ट्र

Kavathe Mahankal Nagar Panchayat President Election News : कवठेमहांकाळात भाजपनं मारलं मैदान; एनसीपी धक्क्यात

विजय पाटील

Kavathe Mahankal Nagar Panchayat President Election News : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ (kavathe mahankal nagar panchayat president election) नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाजपचे खासदार संजयकाका पाटील (MP (sanjaykaka patil) गटानं बाजी मारली आहे. या निवडणूकीतील पराभव हा सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते राेहित पाटील (rohit patil) यांना माेठा धक्का मानला जात आहे. (Sangli Latest Marathi News)

दहा महिन्यांपूर्वी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी बाजी मारली होती. तर भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला होता. (Breaking Marathi News)

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकादी सत्ता मिळवली होती. मात्र दहाव्या महिन्यात खासदार संजय काका पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

आज नगराध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटले. परिणामी खासदार संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या. संजयकाका गटाच्या सिंधुताई गावडे आणि रोहित पाटील गटाचे उमेदवार राहुल जगताप यांना प्रत्येकी आठ मतं मिळाली. (Maharashtra News)

त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिठ्ठीवर मतदान घेतलं. यामध्ये संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे (ncp) बहुमत असून सुद्धा खासदार संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्यानं राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील (rohit patil) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT