BJP Rajsabhya Candidates Saam Tv
महाराष्ट्र

Rajya Sabha Election: भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; अशोक चव्हाण यांना संधी तर राणेंना डावललं

BJP Rajya Sabha Candidates: भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केलीय. महाराष्ट्रातील नेत्यांची उमेदवारीसाठी वर्णी लागलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(प्रमोद जगताप)

Bjp Announced Rajya Sabha Candidates List :

भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केलीय. महाराष्ट्रातील तीन नेत्यांची उमेदवारीसाठी वर्णी लागलीय. मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण,अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आलीय.(Latest News)

राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकीसाठी भाजपने (BJP) जाहीर केलेल्या नव्या यादीत गुजरातमधील चार उमेदवारांना (Candidates) संधी देण्यात आलीय. तर महाराष्ट्रातील तीन नेत्यांना उमेदवारी देण्यात आलीय. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे मोदी सरकारमध्ये (Modi Government) मंत्री पदावर असलेल्या नारायण राणेंना मात्र डावलण्यात आले आहे. जेपी नड्डांसह गोविंद भाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि डॉ. जशवंतसिंह सलाम सिंह परमार हे गुजरातमधून उमेदवारी देण्यात आलीय.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरचा दिवस १५ फेब्रुवारी आहे. तर अर्जांची पडताळणी १६ फेब्रुवारी रोजी पार पडेल. तसेच उमेदवारांना २० फेब्रुवारीपर्यंत आपला उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. मिळालेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राज्यसभेसाठी मतदान होऊ शकते. त्याचदिवशी सांयकाळी पाच वाजता या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये उमेदवार मिळाला?

सरकारमध्ये मंत्री असलेल्या नारायण राणेंना पुन्हा संधी देण्यात आलेली नाहीये. यामुळे नारायण राणे आता लोकसभेची तयारी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. नारायण राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panipuri : स्ट्रीट स्टाइल चटपटीत पाणीपुरीचे पाणी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Nail paint: नेलपेंट लावायची सवय असेल तर आजच व्हा सावधान अन्यथा... होतील 'हे' गंभीर परिणाम

Ballot Paper Voting : EVM नकोच, बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात; काँग्रेस, ठाकरे-पवार गट एकवटले

जिंकलात तर EVM मध्ये छेडछाड नाही, हरलात तर छेडछाड; बॅलेट पेपर मतदानाच्या मागणीची याचिका SC ने फेटाळली

Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

SCROLL FOR NEXT