bison in sawantwadi city near sindhudurg saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg News : सावंतवाडी परिसरात गवारेड्यांचा धुमाकूळ, ग्रामस्थ भयभीत

या गव्यारेड्यांमुळे विद्यार्थी शाळेत जाताना घाबरत आहेत. वनविभागाकडून या गव्यारेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

सावंतवाडी शहरातील (sawantwadi) सालईवाडा भागात जंगली गव्यारेड्यांचा मुक्त संचार आढळून आला आहे. शहरात भरवस्ती लगत हे गवे रेडे चरताना दिसून आले. गवे रेडे भरवस्तीत येऊ लागल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. (Maharashtra News)

सावंतवाडी येथे राजरोसपणे गव्यांचा कळप लोकवस्ती नजीक मुक्त संचार करु लागला आहे. यामुळे ग्रामस्थ व लहान मुलांना घरा बाहेर पडणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे वनविभागाकडून या गव्यारेड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

स्फोटक वस्तू चावल्याने गाय गंभीर जखमी

चरण्यासाठी सोडलेल्या गाईने गावठी बॉम्बसदृश्य स्फोटक वस्तू चावल्याने त्याचा गाईच्या तोंडात स्फोट होऊन गाय गंभीर जखमी झाली. ही घटना नुकतीच कुडाळ तालुक्यात घडली. बांबुळी-नेहरूनगर धनगरवाडी येथील कानोजी म्हाडदळकर यांच्या मालकीची गाय गंभीर जखमी झाली आहे. याबाबत कानोजी म्हाडदळकर यांनी अज्ञात व्यक्ति विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

SCROLL FOR NEXT