bird care center in taloda on occasion of kite festival nandurbar saam tv news
महाराष्ट्र

Makar Sankranti 2024: जखमी पक्षांसाठी 'सहयोग' पक्षी चिकित्सालय, पतंगोत्सवात नायलाॅन मांजा वापरु नका; नंदुरबारवासियांना आवाहन

आज मकर संक्रांत निमित्त देशभरात पतंग उडविण्याचा आनंद नागरिक लुटतात.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Kite Festival In Nandurbar :

मकर संक्रांतीच्या (makar sankranti) पर्वात पतंग (kite) उडविण्यासाठी नागरिक अनेकदा घातक अशा नायलॉन अथवा चायना मांजा यांचा वापर करतात. या धाग्यामुळे मोठ्या प्रमाणात आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना इजा होते. काहीवेळा तर पक्ष्यांना आपला जीव देखील गमवावा लागतो. हे लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा (taloda) शहरात सहयोग सोशल ग्रुप यांच्याद्वारे दरवर्षी मकर संक्रांतीच्या पर्वात मोफत पक्षी चिकित्सालय हा अनोखा उपक्रम राबविला जातो. यंदा देखील उपक्रम राबविण्यात आला आहे. (Maharashtra News)

सहयोग सोशल ग्रुप तर्फे पक्षी वाचवा पर्यावरण टिकवा या अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात पक्षीचिकित्सालय उघडण्यात आले आहे. हे तात्पुरत्या स्वरूपात पक्षी चिकित्सालय असले तरी हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून पतंगोत्सवात जखमी पक्षांसाठी हा वरदान ठरणार आहे.

पतंग उडविताना युवकांनी पक्षी जखमी होणार नाही, कोणाला इजा होणार नाही यादृष्टीने खबरदारी घेतल्यास निश्चितच पक्षी जखमी होणार नाहीत. तसेच घातक अशा नायलॉन मांजाच्या कोणीही उपयोग करू नये असं आवाहन यावेळी करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT