Ratnagiri Sea  Saam TV
महाराष्ट्र

Ratnagiri Sea : समुद्राचं पाणी एवढं कसं वाढलं? पाण्याचा रंगही बदलला; किनाऱ्यावरील होतं नव्हतं धुवून नेलं

Ratnagiri News : समुद्राच्या लाटांमध्ये पर्यटकांच्या वस्तू देखील वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

अमोल कलये

Ratnagiri News : रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे. समुद्राच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने चौपाटीवरील दुकानांमध्ये देखील पाणी शिरले आहे. समुद्राच्या लाटांमध्ये पर्यटकांच्या वस्तू देखील वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

समुद्राचे पाणी गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी लागले आहे. कोकण किनारपट्टीवरील बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलले. दोन दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आले आहे.

मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह

रत्नागिरी, कोकण किनारपट्टीवर मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मॉन्सून सक्रिय होण्याच्या आधी निळाशार समुद्राचा रंग बदलला आहे. समुद्राचे अंतर्गत प्रवाह बदलल्याने समुद्राचा रंगही लालसर झाला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीवर मोठी समुद्राची भरती आली आहे. (Latest News Update)

 'बिपरजॉय' चक्रीवादळ भारताच्या वेशीवर

'बिपरजॉय' चक्रीवादळ हळूहळू भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे कूच करत आहे. या चक्रीवादळचा चार राज्यांना फटका बसू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनला फटका बसू शकतो. पुढील ४८ तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र स्वरूप धारण करू शकते, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, एनएसयूआयने 'विद्यार्थी न्याय मोर्चा' काढला

Heart attack: हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? सोप्या शब्दांत समजून घ्या

गावरान टाकळा भाजी कशी ओळखायची?

'त्या' दोघांनाही सोडले जाणार नाही; जंतर-मंतर आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा

Pune Crime: पुणे हादरले! अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी रक्तरंजित थरार, मिरवणुकीत टोळक्याने तरुणाला संपवलं

SCROLL FOR NEXT