Businessman Sexual Assault Saam Digital
महाराष्ट्र

Businessman Sexual Assault: प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपतीने डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप, उद्योगविश्वात खळबळ

Businessman Sexual Assault: एका प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपतीवर डॉक्टर महिलेने बलात्काराचे आरोप केल्यामुळे उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

Businessman Sexual Assault

एका प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपतीवर डॉक्टर महिलेने बलात्काराचे आरोप केल्यामुळे उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित उद्योगपतीने लग्नाचे आमिष दाखवू शारीरिक शोषण आणि अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.उद्योगपती एक शक्तिशाली व्यक्ती असल्याने आपल्या कुटुंबाला इजा होऊ शकते,असे पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

24 जानेवारी 2022 रोजी वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयात ३० वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार केला होता. यासंदर्भात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. शेवटी 13 फेब्रुवारी 2023 रोजी उद्योगपतीविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित उद्योगपतीविरोधात कलम 376, 354 आणि 506 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उच्चशिक्षित तरुणीला तीन लाखांचा घातला गंडा

पुण्यातील वाघोली येथील उच्चशिक्षित तरुणीला ख्रिसमसनिमित्त महाबळेश्वरला जायचं होतं. तिथे राहण्यासाठी तिला हॉटेलची गरज होती. त्यामुळे तिने ऑनलाईन माहिती घेत द कीज हॉटेलमध्ये रूम घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधत हॉटेलचे कर्मचारी बोलत असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेतली. तरुणीच्या खात्यातून परस्पर तीन लाख पाच हजार रुपये लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT