bullet silencer, Buldhana saam tv
महाराष्ट्र

Bullet Modified Silencer : बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्या गॅरेज मालकांवर हाेणार कारवाई; जाणून घ्या कारण

Patakha' Silencers : बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्या गॅरेजवरही कारवाई करुन अशी माहिती ठाणेदारांनी दिली.

संजय जाधव

Buldhana News : बुलेट ही शानदार सवारी असली तरी आता फटाके फोडल्यासारखे आवाज करत गेलात तर बुलेट राजांविरोधात कारवाई होणार आहे. कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या बुलेट विरोधात खामगाव शहर पोलिसांनी (khamgaon city police) मोहीम हाती घेतली आहे. (Maharashtra News)

एक फॅशन म्हणून दुचाकीचालक बुलेटकडे पाहतात. बुलेटराजा वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असताना एकूण शहराचे वाहतुकीचे नियम पाळण्यात बेशिस्त असल्याची आकडेवारी पुन्हा समोर आली आहे. एकूणच वाहतुकीच्याबाबतीत हम नही सुधरेंगे हा बाणा खामगावकरांनी कायमच ठेवला आहे. त्यामुळे आता कारवाईचा बडगा उगारल्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

सायलेन्सरच्या माध्यमातून फटाक्याचा आवाज काढले जाणा-या बुलेट चालकाला किंवा मालकाला आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. त्याचबरोबर गॅरेज मालकांवर देखील कारवाई होणार आहे. बुलेटचा मूळ सायलेन्सरचा आवाज मोठा नसतो. त्यात बदल करून असा मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवले जातात. त्यामुळे बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्या गॅरेजवरही कारवाई केली जाणार आहे अशी माहिती ठाणेदारांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Record: आता तुमच्या जमिनीचेही असणार आधारकार्ड; नकाशा, नोंदणी अन् कोर्ट केसची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT