Maharashtra Politics  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मातोश्री आमच्यासाठी मरेपर्यंत देवस्थान; शिंदे गटाच्या आमदाराचे मोठे विधान

"बाळासाहेब आमच्यासाठी विठ्ठल आहेत तर मातोश्री देवस्थान आहे"

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pandharpur News : शिंदे गटाचे दोपोलीचे आमदार योगेश कदम आज पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी‌ संवाद साधला. यावेळी योगेश कदम म्हणाले की, आमच्यासाठी मातोश्री म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्या पलीकडे आम्ही मातोश्रीला कधी बघितलंच नाही. बाळासाहेब आमच्यासाठी विठ्ठल आहेत. तर मातोश्री देवस्थान आहे. मरे पर्यंत ते आमच्यासाठी कायम देवस्थानच असेल अशा शब्दांत शिंदे गटाचे दोपोलीचे आमदार योगेश कदम यांनी आज आपली भावना व्यक्त केली.

विठ्ठलाच्या कृपेमुळे अपघातातून वाचलो. पुढचे आयुष्य जनतेच्या सेवेसाठी समर्पित केल्याचे आमदार कदम यांनी सांगितले. आज माघ वारीच्या निमित्ताने आमदार कदम विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur) आले होते.

दर्शनानंतर पत्रकारांशी‌ बोलताना बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत असून मातोश्री देवस्थान असल्याचे सांगितले. आजही बाळासाहेबांचे विचार घेवून आम्ही समाजकारण आणि राजकारण करतो असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राजकीय टिप्पणी करणे कटाक्षाने टाळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

diwali shopping in mumbai : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT