Eknath Shinde News Saam tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा, अचानक नेमकं काय घडलं?

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. दोन बड्या नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

Vishal Gangurde

एकनाथ शिंदेंना धाराशिवमधून मोठा धक्का बसलाय

धाराशिवमधील दोन नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

दोन्ही नेत्यांचा करुणा मुंडे यांच्या स्वराज्य शक्ती सेना पक्षात प्रवेश

राज्यात काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका पार पडल्यानंतरही राजकीय घडामोडी सुरूच आहे. निवडणुकीनंतर राजकीय नेत्यांचे सोईनुसार राजकीय पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मोठा बसला आहे. धाराशिवमधील दोन नेत्यांनी एकनाथ शिंदेंची साथ सोडली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, धाराशिव जिल्ह्यातील नाभिक सेनेचे खजिनदार अनिल शिंदे आणि मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब समुद्रे यांनी शिवसेनेची साथ सोडली आहे. या दोन्ही नेत्यांनी करुणा मुंडे यांच्या स्वराज्य शक्ती सेनेत प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांनी करुणा मुंडे यांच्या उपस्थितीत स्वराज्य शक्ती सेनेत प्रवेश केला आहे.

दोन्ही नेत्यांच्या पक्ष प्रवेशावर करुणा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.'दोन्ही नेत्यांना शिंदे गटात न्याय मिळत नव्हता. त्यांना त्यांच्या प्रमुख नेत्यांना भेटता येत नव्हतं. त्यामुळे संतप्त होऊन स्वराज्य शक्ती सेनेत प्रवेश केला, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.

कसा आहे करुणा मुंडे यांचा राजकीय प्रवास?

करुणा मुंडे सातत्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. त्यांनी १२ जानेवारी २०२४ रोजी स्वराज्य शक्ती सेना पक्षाची नोंदणी केली. त्यांच्या पक्षाचं कार्यालय बीडमध्ये देखील आहे. करुणा मुंडे यांनी २०२४ साली विधानसभा निवडणुकीत परळी आणि बीडमधून अर्ज दाखल केला होता.

परंतु करुणा यांचा परळीत अर्ज बाद झाला होता. त्यानंतर त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी करुणा मुंडे यांचा दारुण पराभव झाला होता. आता त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेत धाराशिवमधील दोन नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात करुणा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT