Pune Police Saam Digital
महाराष्ट्र

Breaking News : पुणे पोलिसांची थेट दिल्लीत मोठी कारवाई, ८०० कोटींचे अमली पदार्थ जप्त

Sandeep Gawade

Pune Police

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात सोमवारी रात्री (१९ फेब्रुवारी) गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करून १०० कोटींपेक्षा अधिक अमली पदार्थ जप्त केले होते. ५२ किलो मेफेड्रॉनचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दरम्यान पुण्यात जप्त केलेल्या अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला परदेशी नायजेरीयन नागरिकाने एमडी ड्रग्स दिले होते. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथकं रवाना झाली होती. दरम्यान पुणे पोलिसांची पथकं काही तासातच दिल्लीत पोहचली असून मोठी कारवाई केली आहे. ४०० किलो अमली पदार्थ जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत ८०० कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुणे ड्रग्स तस्करी प्रकरणाचे नायजेरीयन कनेक्शन असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली होती. पुण्यात जप्त केलेल्या ड्रग्स प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला परदेशी नायजेरियन नागरिकाने अमली पदार्थ दिले होते. याची किंमत कोट्यवधी रुपये होती. शेखकडे हे एमडी ड्रग्स भारतातील विविध भागात पोहचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या नायजेरियन नागरिकाचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक रवाना झालं होतं. त्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या पुणे पोलिसांच्या पथकाच्या हाती अमली पदार्थांचे घबाड हाती लागलं आहे.

२ दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३ जणांना अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख अशी या ३ आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. माने आणि हैदर शेख हे मागील वर्षी येरवडा कारागृहातून बाहेर आलेत. तेव्हापासून या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली. हैदरने ड्रग्स साठा मिठाच्या पाकिटात पुण्यातील विश्रांतवाडी भागात लपावला होता.

पुण्यातील अमली पदार्थ तस्करीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. तसंच पुण्यात जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची विक्री देशातील विविध भागात तसचं परदेशात होणार होती. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे त्यांची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. अशात आता हैदर शेखकडे सापडलेले अमली पदार्थ एका नायजेरियन व्यक्तीने त्याला दिल्याची माहिती मिळाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT