MLAs of Ajit Pawar group Met Jayant Patil  Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO : मोठी बातमी! अजित पवार गटाच्या 6 आमदारांनी घेतली जयंत पाटील यांची भेट; पुन्हा करणार घरवापसी?

MLAs of Ajit Pawar group Met Jayant Patil: लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अजित पवार गटाचे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतणार, अशी चर्चा सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाच्या काही आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुनील कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाचे पाच ते सहा आमदार हे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीला पोहोचले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानभवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यातच विधानसभा निवडणुकीआधी राज्यात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

जयंत पाटील यांनी अलीकडेच लोकसभेच्या निकालानंतर म्हटलं होतं की, काही लोक जे आमाला सोडून गेले आहेत. ते सोबत असते तर नक्कीच जागा वाढल्या असत्या, असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर ही मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांची भेट घेणारे हे आमदार पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटाच्या आमदारांनी आज दुपरी जयंत पाटील यांची भेट घेतली होती. विधानभवनातल्या एका खोलीमध्ये जयंत पाटील बसले होते. त्याचवेळी अजित पवार गटाचे एक एक आमदारांनी त्यांची भेट घेतली.

नेमके कोण होते हे आमदार, याबाबत अद्याप माहिती उघड झालेली नाही. मात्र ज्यावेळी उद्या अर्थसंकल्प सादर होईल, त्यानंतर जे राजकीय समीकरण बदलतील, त्यावेळी हे आमदार शरद पवार गटात प्रवेश करू शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.

सूत्रांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, अजित पवार गटाच्या काही आमदारांकडून सातत्याने शरद पवार गटाच्या नेत्यांना संपर्क केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT