Eknath shinde , Mahesh Shinde , Ramraje Naik Nimbalkar, Satara , Koregoan, NCP, Shivsena, BJP Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार; काय आहे प्रकरण?

औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अगदी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद (Aurangabad) दौरा केला होता. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना शिंदेंनी हजेरी लावली होती. आता त्यांचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी औरंगाबादमधील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. (CM Eknath Shinde Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे, शिवाय रात्री 10 नंतर सुद्धा लाऊडस्पीकरवर कार्यक्रम सुरू होते. त्यामुळे गुन्हा दाखल करा अशी मागणी कस्तुरे या व्यक्तीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये नियमांचं उल्लंघन झाले आहे अशी तक्रार आनंद कस्तुरे यांनी केल्यानंतर चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल असं पोलीस अधिकारी सांगितले आहे. मात्र असं असलं तरी, पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावानं उद्यान कार्यक्रम रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत यावेळी ते माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्वखर्चातून बांधलेल्या नामदार एकनाथ भाई शिंदे उद्यानाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार होते. मात्र, आता त्या उद्यानाचं उद्घाटन कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे.

प्रशासकीय मान्यता नसल्याने हा उदघाटनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. तसंच या उद्यानाचं नाव देखील आता काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे केवळ नागरिकांना भेटून पाहणी करून जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT