Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet : मोठी बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ धडाकेबाज निर्णय, कुणाला होणार फायदा?

Maharashtra Cabinet Meeting : महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली. याशिवाय १७,४०० कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पांना हिरवा कंदील आणि शिक्षण क्षेत्रातील मोठे निर्णय घेण्यात आले. जाणून घ्या सर्व महत्त्वाचे निर्णय.

Namdeo Kumbhar

Maharashtra cabinet decisions June 2026 : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे. पण त्यासोबतच ३ महत्त्वाचे अन् धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकेकडून कोट्यवधींच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील रस्त्यांच्या जाळ्याचा कायापालट करण्यासाठी दोन मोठ्या बँकांकडून तब्बल १७,४०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. दुसरीकडे, मुंबईतील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करत हैद्राबाद नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठात ६ नामांकित महाविद्यालयांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णयही सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता.

रस्त्यांच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला दोन्ही बँकाकडून मिळणार प्रत्येकी ८ हजार ७०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य. राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार.

हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई. किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, मुंबई. श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई. ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग

भाजपला मोठा हादरा; दिग्गज नेत्याने पक्ष सोडला, नव्या पक्षाची करणार घोषणा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार होणार ₹ 72,000 ? फिटमेंट फॅक्टरसंबंधी महत्वाची अपडेट

Wedding Dispute: लग्नमंडप की कुस्तीचा आखाडा? “आमच्या लोकांना जेवण का नाही?” प्रश्न विचारताच पाहुण्यांमध्ये जोरदार हाणामारी

Health Care: वेगवेगळे तेले, वेगवेगळे फायदे! बेंबीत कोणते तेल कधी टाकल्याने शरिराला होतो फायदे ?

SCROLL FOR NEXT