sanjay raut and eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; राऊतांच्या दौऱ्यापूर्वी असंख्य पदाधिकारी शिंदे गटात

ठाकरे गटाला पुन्हा खिंडार! अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

Nashik Shivsena News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाकरे गटामधील गळती काही थांबताना दिसत नाही आहे. आज नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते हे शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

आज सकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होत आहे. तर दुसरीकडे  यामध्ये  विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे गट आणि महविकासआघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.  

आज खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊत २ दिवस नाशिक दौऱ्यावर आहे. मात्र आजच नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात मोठं खिंडार पडल्याने ठाकरे गटाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, याआधी नाशिकमधील १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सातत्याने ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तरी देखील ठाकरे गटातील गळती सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.

परभणीत 30 नगरसेवक शिंदे गटात

परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करताना सध्या अनेक लोक येऊन पक्षाला जोडली जात आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो.

राज्यातील सरकार सत्तेत आल्यापासून कष्टकरी, शेतकरी कामगार आशा सर्वच घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

SCROLL FOR NEXT