Big blow to Congress parbhani pathri MLA Suresh Warpudkar resigned on demand maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Congress MLA Resigns: काँग्रेसला मोठा धक्का, मराठा आरक्षणासाठी आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

MLA Suresh Warpudkar Resigns: राजीनाम्याबाबत वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहलं आहे.

Satish Daud

Congress MLA Suresh Warpudkar Resigns

मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केही जात आहे. या आंदोलनाचा फटका राजकीय नेत्यांना देखील बसला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे राज्यातील आमदार-खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकीकडे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा होत असताना आता काँग्रेसच्या आमदाराने देखील राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे परभणीतील (Parbhani News) आमदार सुरेश वरपुडकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वरपुडकर हे पाथरी मतदार संघातील आमदार आहेत.

राजीनाम्याबाबत वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहलं आहे. मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणासाठी (Maratha Aarakshan)मी विधान सभा सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, आपण माझा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती वरपुडकर यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे.

सुरेश वरपुडकर यांनी पत्रात काय म्हटलंय?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मी सर्वस्वी पाठींबा देत असून सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्यात यावे.

तसेच धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मागील कित्येक वर्षांपासून त्यांचा लढा चालू आहे, त्याची दखल न घेता धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण देण्याची भूमिका शासन घेताना दिसत नाही. धनगर समाजास उपेक्षित प्रवर्गातील आरक्षण जाहीर करावे.

त्याचप्रमाणे मुस्लीम बांधवाना सुध्दा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ज्या प्रवर्गात आरक्षणाची गरज आहे. ते आरक्षण मुस्लीम समाजास देण्यात यावे. वरील मागण्यांसाठी मी माझा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं सुरेश वरपुडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT