Crime News
Crime News Saam TV
महाराष्ट्र

नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! मुली पळवून नेणारी टोळी जेरबंद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून लहान मुलींच्या अपहरणाचा अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. जिल्ह्यात लहान मुलींच्या अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पाहा -

गुजरात आणि मध्यप्रदेश मधून या टोळीला अटक करण्यात आली आहे. ओझर मध्ये 2 महिन्यात 2 मुलींचे अपहरण झाले होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ओझर मधील एक महिला पैशांसाठी हे काम करत असल्याचे उघडकीस आले आहे.

ओझर पोलिसांनी शिताफीने ही कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 2 महिला 2 पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी याला ऑपरेशन मुस्कान म्हणून नाव दिले होते. यामध्येअल्पवयीन मुलींना फूस लावून विकणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सर्व मुली दहा ते बारा वयोगटातील आहे.

संशयितकडून पंचवटी, सातपूर फुलेनगर इथल्या देखील मुली फूस लावून पळवून नेण्याची कबुली देण्यात आली आहे. ओझर गुन्हे शोध पथक पाच दिवस गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये तळ ठोकून होते आणि त्यामुळेच अखेर ऑपरेशन मुस्कान ला यश आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratibha Patil: माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील घरातूनच करणार मतदान, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार

Maharashtra Politics 2024 : आमच्या कार्यकर्त्यांना धमकवलं जातंय, १३ तारखेनंतर सगळा हिशेब करू; निलेश लंकेंनी भरला दम

Kalyan News: कल्याणमध्ये रिक्षा पार्किंगवरून वाद, मारहाणीत एकाचा मृत्यू

Nilesh Lanke News | 'पोलिस निरिक्षकाला जाऊन सांगा तुमचा बाप येतोय' लंकेंची पोलिसांना धमकी

Chhattisgarh Naxalite Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, नारायणपूरमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा

SCROLL FOR NEXT