Beed scam: जलयुक्त शिवार योजना घोटाळ्यात मोठी कारवाई; 3 अधिकाऱ्यांना अटक विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed scam: जलयुक्त शिवार योजना घोटाळ्यात मोठी कारवाई; 3 अधिकाऱ्यांना अटक

घोटाळ्यातील 3 निवृत्त अधिकाऱ्यांना अटक..नव्वद लाख रुपयाच्या वसुलीचे कृषी सहसंचालकानी आदेश

विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यामधील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्यात (Jalayukta Shivar Yojana) मोठी कारवाई करण्यात आली आहे. घोटाळ्यातील मुख्य ३ निवृत्त अधिकाऱ्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. ९० लाख रुपयांच्या वसुलीचे आदेश, औरंगाबाद (Aurangabad) विभागाच्या कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळा गेल्या ५ वर्षांपासून गाजत आहे. तर गेल्या ५ वर्षांपासून फरार असलेल्या ३ निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना परळी पोलिसांनी राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

सुनील गीते (वय- ५८) उल्हास भारती (वय- ६४) त्र्यंबक नागरगोजे (वय- ६४) अशी अटक करण्यात आलेल्या, निवृत्त कृषी पर्यवेक्षकांची नावे आहेत. जलयुक्त शिवारात घोटाळ्यासंदर्भात २०१७ मध्ये परळी पोलीस ठाण्यामध्ये २ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदार यांचा समावेश होता.

दरम्यान या बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांकडून, ९० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश, औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. या जलयुक्त शिवारातील घोटाळ्यासंदर्भात आत्तापर्यंत, परळीतील अनेक अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई झाली आहे. काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर मागच्या अनेक दिवसापासून याची चौकशी सुरू आहे. या कामांमध्ये ९० लाख रुपयांच्या वसूल पात्र असलेल्या संस्थांना नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील एकूण ६२ कंत्राटदार संस्था आणि अधिकारी कर्मचार्‍यांकडून या रकमेची वसुली केली जाणार आहे. तर या कारवाईने घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

Maharashtra Live News Update: शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी एक लाख 11 हजार रुपयांची मदत मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

SCROLL FOR NEXT