VIshal NArwade Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News : निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याने IAS अधिकाऱ्याची बदली, नातेवाईक व समर्थकांची तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी

IAS VIshal Narwade Transefer : निवडणूक काळात कुठल्याही उच्च अधिकाऱ्याला स्वतःच्या जिल्ह्यात नियुक्ती देता येत नाही, अशी तक्रार करण्यात आली होती.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव | बुलडाणा

Buldhana News :

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांची बदली करण्यात आली आहे. नरवडे हे बुलडाणा जिल्ह्याचेच रहिवासी असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवसा आधीच नियुक्ती करण्यात आली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र या नियुक्तीवर आझाद हिंद शेतकरी संघटनेन आक्षेप घेतला. निवडणूक काळात कुठल्याही उच्च अधिकाऱ्याला स्वतःच्या जिल्ह्यात नियुक्ती देता येत नाही, अशी तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे विशाल नरवाडे यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सतीश रोठे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. (Latest Marathi News)

निवडणूक आयोगाने याची दखल घेत 48 तासाच्या आत आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली केली. अॅड. सतीश रोठे यांनी केलेल्या तक्रारीमुळेच विशाल नरवाडे यांची बदली झाल्याचा आरोप करत अॅड. सतीश रोठे यांना आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांच्या नातेवाईकांनी व समर्थकांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी बुलढाणा पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल झाला आहे. याची दखल घेत आता निवडणूक आयोगाने पत्र देऊन अॅड. सतीश रोठे यांना आचारसंहिता लागू असेपर्यंत संरक्षण देण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT