Nagpur earthquake today latest news : उपराजधानी नागपूर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरली आहे. दुपारी अचानक नागपूर शहर आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे जमीन हादरल्याने काही वेळासाठी नागपूरकरांची पळापळ झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी नागपूर शहरात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.० इतकी नोंदवण्यात आली आहे.
नागपूरच्या काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जमिनीखाली ८ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे."
(बातमी अपडेट होत आहे)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.