Bhiwandi East Vidhan sabha Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi East Vidhan sabha : भिवंडी पूर्वचा तिढा वाढला, मविआमध्ये रस्सीखेच; ठाकरे गट अग्रही, पदाधिकारी बंडाच्या तयारीत

bhiwandi News : भिवंडी पूर्व शिवाय संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी रुपेश म्हात्रे यांची उमेदवारी उध्दव ठाकरे यांनी जाहीर करावी; अशी एक मुखी मागणी केली.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

भिवंडी : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना शिवसेना उबाठा पक्ष भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासाठी शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. इतकेच नाही तर राजीनामा देऊन बंद करण्याची देखील तयारी उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शविली आहे. 

भिवंडी (Bhiwandi) जिल्हा मध्यवर्ती शाखेत आयोजित बैठकीत जिल्हा प्रमुख विश्वास थळे, शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश भोईर, इरफान भुरे, महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे,यांसह मोठ्या संख्येने महिला युवासेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. या बैठकीत भिवंडी पूर्व शिवाय संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी रुपेश म्हात्रे यांची उमेदवारी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर करावी; अशी एक मुखी मागणी केली. यासाठी मातोश्रीवरील पक्ष प्रमुखांना एक संधी द्या, नाहीतर रुपेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना निवडून आणा. नुसती भाषण करून काही होत नाही, तसे केले तर पक्ष संपेल. पक्ष नेतृत्वाने पक्ष कमकुवत करायला घेतला असा त्याचा अर्थ होईल म्हणून सर्वांनी एकदा मातोश्रीवर जाऊन आपली भूमिका मांडून सामूहिक राजीनामे देऊन रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरावे अशी मागणी केली आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा उबाठा गटाकडे यावी; यासाठी आमचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रुपेश म्हात्रे यांचा २०१९ मध्ये काही मतांनी पराभव झाला, म्हणून ही जागा समाजवादी पक्षाच्या वाट्याला जात असेल तर ते चुकीचे आहे. समाजवादी पक्षाने परस्पर पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांचा महाविकास आघाडीसोबत संबंध नाही. अशा परिस्थितीत रुपेश म्हात्रे यांची भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर होईल; असा विश्वास जिल्हाप्रमुख विश्वास थळे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT