Bhiwandi Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi : गाडी पार्किंगवरून वाद; पोलिस हवालदाराला मारहाण, टोळक्याला अटक करत १ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi Crime News : रात्रीच्या सुमारास पाऊस आल्याने एका शेडखाली उभ्या असलेल्या पोलिसाशी चौघांनी मिळून वाद घालत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाईल देखील हिसकावून फरार झाले होते

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
भिवंडी
: कर्तव्यावर असलेल्या पोलिस हवालदाराला मारहाण करून त्यांचा मोबाईल जबरीने हिसकावून नेण्यात आल्याची घटना भिवंडीत घडली होती. पोलिसाला मारहाण करणाऱ्या चौघांच्या टोळक्याला बेड्या ठोकण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी टोळक्याच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली आहे.

भिवंडीच्या कोनगाव पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असलेले सुनील पाटील हे २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कर्तव्य बजावून घरी परत येत असताना पाऊस सुरु झाला. यामुळे ते कल्याण बायपास रस्त्यावरील वेल्डींग ऑटो गॅरेज सलमान हुड मेकर या दुकानाच्या शेड खाली उभे राहिले. त्यावेळी त्यांच्या मागून आलेल्या मोटार सायकल चालक धीरजने पोलिस सुनील पाटील यांच्यासोबत पार्किंग वरून वाद घातला होता. 

पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण 

वाद वाढत गेल्याने धीरज याच्या समवेत चौघांनी पोलिस सुनील पाटील यास शिवीगाळी करून मारहाण केली होती. इतकेच नाही तर त्यांचा मोबाईल हिसकावून या चौघांनी येथून पळ काढला होता. या प्रकरणी पोलीस हवालदार सुनील पाटील यांनी पोलिसात जाऊन या बाबत तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत चौघांची माहिती काढली. 

चौघांना अटक करत मुद्देमाल जप्त 

यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार चारही आरोपींची ओळख पटवून चौघांना अटक केली. यात धिरज रामचंद्र भोये (वय २१), हितेश दिलीप भोये (वय २१), बळीराम रामदास चौधरी (वय २३), नितीन उर्फ सुशांत सुरेश लाहरे (वय २३, सर्व मूळ रा.जव्हार, पालघर) यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल, ९० हजार रुपयांच्या दोन मोटर सायकली असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT