Bhiwandi News Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi : अनुदानित युरिया खताचा अवैध साठा; २ ट्रक खत जप्त, गोडाऊनला लावले सिल

Bhiwandi News : अनेकदा युरिया खताची टंचाई जाणवत असते, प्रामुख्याने कृषी केंद्र चालकांकडून खतांचा साठा दाबून ठेवत कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. नंतर जादा दराने या खतांची विक्री करण्यात येत असते

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

भिवंडी : शेतीसाठी अतिशय उपयुक्त्व असलेलय युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार केला जात असतो. तर अनुदानित युरिया खत कालाबाजार विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी कृषी विभाग व पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून दोन ट्रक युरिया खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे.  

पिकांच्या वाढीसाठी शेतकरी वर्ग शेतात मोठ्या प्रमाणात युरिया खताचा वापर करत असतो. सध्या पाऊस सुरु असल्याने खतांचा वापर होत नाही. मात्र पाऊस ओसरल्यानंतर पिकांना खत देण्यास सुरवात होईल. यावेळी खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. प्रामुख्याने युरिया खताची मागणी अधिक होत असते. मात्र काही विक्रेते शेतकऱ्यांना जास्तीच्या दराने खत विक्री करत असल्याचे समोर आले आहे. यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असते. 

१४० मेट्रिक टन साठा जप्त 

भिवंडी तालुक्यातील कुरुंद येथील के स्क्वेअर गोडाऊन संकुलात अशा पद्धतीनं युरिया खताचा अवैध साठा करून ठेवण्यात आलेला होता. याबाबत भिवंडी तालुका कृषी विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाने पडघा पोलीसांच्या मदतीने छापा टाकून प्रशासनाने मोठा साठा सिलबंद केला आहे. यामध्ये साधारण १४० मेट्रिक टन साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

कृषी विभागाने स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने गोडाऊनमध्ये अनुदानित युरिया खताच्या मोठ्या प्रमाणात १४० मेट्रिक टन अवैध साठवणूक करण्यात आलेले आढळून आला आहे. या कारवाईत शेती वापराचा अंदाजे १४० मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आला असून त्याचे बाजारमूल्य ८० ते ८४ लाख रुपये इतके असल्याचा अंदाज आहे. याबाबत पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT