ATM Crime Saam tv
महाराष्ट्र

ATM Crime : बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदलले; फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Bhiwandi News : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदली करून तसेच पैसे काढणारे इसमाचे पिन नंबर पाहून एटीएममधून पैसे काढून फसवणूक केले

Rajesh Sonwane

फय्याज शेख 

भिवंडी : एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदलवून घेत पैसे काढले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भिवंडीतील सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.  

एटीएम मशीनमध्ये (ATM Crime) झालेल्या प्रकाराबद्दल पोलिसांनी तपास सुरु केला. भिवंडी गुन्हे शाखा घटक २ शहरामध्ये समांतर तपास करीत असताना सीसीटीव्हीच्या फुटेजवरून तसेच मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे संशयित आरोपी विकी राजू वानखेडे याला उल्हासनगर (Ulhasnagar) येथे राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. 

सदर आरोपीस विश्वास घेऊन अधिक तपास केला असता त्याने एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या इसमांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदली करून तसेच पैसे काढणारे इसमाचे पिन नंबर पाहून एटीएममधून पैसे काढून फसवणूक केले. त्याने (Bhiwandi) भिवंडी, दिवा, चेंबूर, मुंबई या भागात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BP Measurement Tips: ब्लड प्रेशर घरी तपासण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टरांनी दिली सर्वात महत्वाची माहिती

Maharashtra Live News Update: जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक पेट घेतला

Kajuchi Bhaji Recipe: कोकणी स्टाईल ओल्या काजूची भाजी कशी बनवायची? पारंपारिक रेसिपी वाचा

Rain Alert: विदर्भ- मराठवाड्यासाठी ७२ तास महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Kavya Maran trolling: सनरायझर्सचा निर्णय वादात; अबरार अहमदला खरेदी केल्याने काव्या मारन ट्रोल, सोशल मीडिया अकाऊंटही सस्पेंड

SCROLL FOR NEXT