Bhiwandi Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi Crime News : सासू सुनेच्या भांडणात चिमुकल्यानं जीव गमावला, भिवंडीतल्या घटनेनं खळबळ, जाणून घ्या नेमकं काय झालं?

Bhiwandi News : संसाराला सुरवात झाल्यानंतर संशयित आरोपी महिला आणि संदेश या दाम्पत्याला वर्षभरापूर्वी मुलगा झाला. परंतु जन्मतःच मुलाला आजार असल्याचे समोर आले.

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
भिवंडी
: लग्नानंतर वर्षभरातच मुलगा झाल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र मुलाला काहीतरी आजार असल्याने आजारी मुलाला जन्म दिला म्हणून सासू सुनेमध्ये भांडण व्हायचे. याच भांडणातून एक वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. आईनंच एका वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कासणे गावात संदेश भोई (वय ३१) यांचे कुटूंब राहते. दरम्यान संदेश हा जवळच्याच एका गोडाऊन इंडस्ट्रीत रात्रपाळीत सुरक्षा रक्षकाचे काम करतो. संदेश यांचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. संसाराला सुरवात झाल्यानंतर संशयित आरोपी महिला आणि संदेश या दाम्पत्याला वर्षभरापूर्वी मुलगा झाला. परंतु जन्मतःच मुलाला आजार असल्याचे समोर आले. 

मुलाला आजार असल्यानं त्याच्यावर मुंबईतील वाडीया रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आजारी मुलगा जन्माला आला यावरुन सून आणि तिची सासू यांच्यात नेहमीच खटके उडत होते. दरम्यान आरोपीच्या सासू मंगळवारी चिमुकल्याला टिटवाळा येथे आपल्या मुलीकडं घेऊन गेली होती. हवामानात बदल झाल्याने त्याला ताप आला. म्हणून सासू त्याला घेऊन पुन्हा मंगळवारी रात्री घरी कासणे गावी घेऊन आली. 

पहाटे बापाने मुलाला खेळविले 

मात्र चिमुकल्याची प्रकृती बिघडल्यावरुन सून आणि सासूमध्ये रात्रीच्या वेळी जोरदार भांडण झालं. हे भांडण मिटवून संदेश कामावर गेला. यानंतर सासू आणि सून देखील झोपून गेले हेते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पहाटे रात्रपाळीची ड्युटी करून संदेश हा घरी आला. यानंतर घरात खेळत असलेल्या आपल्या एक वर्षाच्या मुलासोबत थोडा वेळ घालविला. यानंतर खेळता खेळता संदेश झोपूण गेला.  

निर्दयी आईने चिमुकल्याला टाकीत बुडविले  

त्यानंतर चिमुकल्याच्या आईनं सर्वांची नजर चुकवून पहाटेच्या सुमारास घराच्या पहिल्या माळ्यावरील टाकीत बुडवून त्याची हत्या केली. संदेश भोई याच्या तक्रारीवरून पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे तर मुलाला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT