Bhiwandi crime Saam tv
महाराष्ट्र

Bhiwandi crime : भिवंडीत कामगारांच्या दोन गटात हाणामारी; एकावर धारदार शस्त्राने वार

Bhiwandi News : एकाच ठिकाणी लूम काम करणाऱ्या मित्रांमध्ये वाद झालेला हा वाद येवढा विकोपाला गेला कि भर रस्त्यावर येत त्यांची हाणामारी झाली. याच हाणामारीत एकाने मित्रावर चाकूने वार केला

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 
भिवंडी
: भिवंडीत लूम कामगारांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत एकाला जबर मारहाण करीत चाकूने हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

भिवंडी शहरातील भोईवाडा पोलिस ठाण्यात हद्दीत रुममध्ये एकाच ठिकाणी काम करणाऱ्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून आपआपसात वाद झाले होते. एकाच ठिकाणी लूम काम करणाऱ्या मित्रांमध्ये वाद झालेला हा वाद येवढा विकोपाला गेला कि भर रस्त्यावर येत त्यांची हाणामारी झाली. याच हाणामारीत एकाने मित्रावर चाकूने वार केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. परिसरातील नागरिक मात्र हा संपूर्ण प्रकार पाहत होते. 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

एकाने धारधार चाकूने हल्ला करत चाकूचे सपासप वार केल्याने एक जण यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला लागलीच उपचारासाठी ठाणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हाणामारीचा सर्व प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात 
आपापसातील वादातून झालेल्या झटापटीत मित्रावरच चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ला करून हल्लेखोर तिथेच उभा राहिला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मात्र फक्त बघायची भूमिका घेतली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. चाकूने वार करणाऱ्या एकाला पोलिसांनी घटनास्थस्ळावरून ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT