Bhivandi Crime News Saam tv
महाराष्ट्र

Bhivandi Crime News: ऑनलाइन गेमिंगमुळे हवालदार कर्जबाजारी; कर्ज फेडण्यासाठी केलेल्या गोळीबारात तरूणाचा गेला जीव

Bhivandi News : ऑनलाइन गेमिंगमुळे हवालदार कर्जबाजारी; कर्ज फेडण्यासाठी केलेल्या गोळीबारात तरूणाचा गेला जीव

Rajesh Sonwane

फय्याज शेख

भिवंडी : मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असताना ऑनलाइन गेमिंगमध्ये ६२ लाखांच्या कर्जात बुडाला. हे कर्ज फेडण्यासाठी (Bhivandi) त्याने लुटमारीचा मार्ग निवडला असता लुटमार करीत असताना दोन तरुणांवर गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र घटनास्थळी दुचाकी सोडून पाळल्याने तो पोलिसांच्या (Police) तावडीत सापडला. (Live Marathi News)

सूरज देवराम ढोकरे (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या हवलदाराचे नाव आहे. तर अजीम अस्लम सय्यद (वय ३०) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र फिरोज रफिक शेख वय (२७) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान १६ ऑक्टोंबरला अजीमचा (Mumbai Police) मुंबई येथील रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पडघा पोलिसांनी अटक हवलदारावर हत्येचाही गुन्हा दाखल करत गेल्या नऊ दिवसापासून तो पोलीस कोठडीत असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एसपी विक्रम देशमाने त्यांनी दिली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अटक आरोपी हवालदार यापूर्वीही अंबाडी भागात येऊन ग्रामीण भागातील नागरिकांना धमकी देऊन हजरो रुपये घेऊन जात होता. याच हजरो रुपयातून तो कर्ज फेडत होता. मात्र लुटमारी करत असतानाच त्याने केलेल्या गोळीबारात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला.  तर याआधीही आरोपीकडून अशाच प्रकारची घटना घडली आहे का ? आणखी काही गुन्हे घडले आहेत का ? याचा तपास पडघा पोलीस करत असल्याची माहिती एसपी  विक्रम देशमाने यांनी  भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT