Sambhaji Bhide News Saam TV
महाराष्ट्र

Sambhaji Bhide: मनमाडमध्ये भीमसैनिकांनी अडवली संभाजी भिडेंची गाडी; पोलिसांकडून अनेकांची धरपकड, पाहा VIDEO

Sambhaji Bhide News: शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची मनमाडमध्ये भीम सैनिकांनी गुरुवारी (ता. २९) रात्री उशिरा गाडी अडवली. यावेळी भीमसैनिकांनी भिडे यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.

Satish Daud

Sambhaji Bhide vs Bhimsainik Manmad Video

शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची मनमाडमध्ये भीम सैनिकांनी गुरुवारी (ता. २९) रात्री उशिरा गाडी अडवली. यावेळी भीमसैनिकांनी भिडे यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत भीम सैनिकांना ताब्यात घेतलं. यावेळी काहींनी संभाजी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मनमाड पोलीस ठाण्यात भीमसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे (Sambhaji Bhide News) हे गुरुवारी नाशिकच्या येवला येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.

कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा ते कारने मनमाड मार्गे धुळ्याकडे निघाले. यावेळी मालेगाव चौफुलीवर भीम सैनिकांनी त्यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही, तर काहींनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  (Latest Marathi News)

यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तातडीने मनमाडमध्ये दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून गोंधळ घालणाऱ्या भीमसैनिकांना ताब्यात घेतलं.

त्यानंतर संभाजी भिडे धुळ्याच्या दिशेने रवाना झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भीमसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. यावेळी भीमसैनिकांनी मनमाड पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

South Chutney Recipe : ना नारळ ना टोमॅटो; साऊथ इंडियन नाश्त्यासोबत स्वादिष्ट लागते 'ही' चटपटीत चटणी, बनवायला खूपच सोपी

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखची गगन भरारी! 'राजा शिवाजी'ची १०० कोटींच्या क्लबमध्ये दमदार एन्ट्री, लवकरच रचणार मोठा इतिहास

Maharashtra Heatwave : राज्याला उन्हाचा चटका, तापमान ४० शी पार; मान्सूनची स्थिती काय? वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

जिल्हा परिषद भरतीत महाघोटाळा? बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर मिळवली सरकारी नोकरी, महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT