Bhima Koregaon : जातीय द्वेष, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पोलीसांचे संकेत रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

Bhima Koregaon : जातीय द्वेष, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पोलीसांचे संकेत

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

रोहिदास गाडगे

पुणे : कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 2 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

हे देखील पहा :

त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल.

पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी आदेशीत केलेले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा आठवा अध्याय कोणती शिकवण देतो?

Personality Traits: 'R' अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT