Tulja Bhavani Temple Saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhavani Temple: सलग सुट्ट्यांमुळे भाविकांचे पावले तुळजा भवानीच्या दारी; देवी दर्शनाबाबत मंदिर संस्थानाने घेतला मोठा निर्णय

तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी वाढणारी गर्दी लक्षात घेता मंदिर स्थंस्थानाने मंदिराचे दार सलग २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

साम टिव्ही ब्युरो

Tuljapur News: सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक भाविकांची पावले तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी वळू लागली आहे. तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी वाढणारी गर्दी लक्षात घेता मंदिर स्थंस्थानाने मंदिराचे दार देवी दर्शनासाठी सलग २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजा भवानी मातेचं मंदिर रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी रात्री १ वाजता चरणतिर्थाने मंदिर उघडले जाणार आहे. त्याचबरोबर सकाळी ६ वाजता अभिषेक घाट होणार आहे. तसेच रात्री ११ वाजता प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिर बंद होणार आहे.

अधिक मास महिना आणि सलग सुट्ट्यांमुळे मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गर्दी होणार आहे. सलग सु्ट्ट्यांमुळे मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्येत वाढ झाली आहे.

दरम्यान, देवी दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने मंदिर संस्थानाने २२ तास मंदिर खुले ठेवण्याच्या घेतला आहे. मंदिर संस्थानाने घेतलेला निर्णयाचा फायदा लाखो भाविकांना होणार आहे.

तुळजापूरमध्ये बोगस पुजारी

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची काही बोगस पुजाऱ्यांकडून फसवणुकीचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली माजली होती.

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो संख्येने भाविक येत असतात. मात्र काही बोगस पुजाऱ्यांकडून भाविकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे. मंदिर परिसरात रात्री उशीरा येणाऱ्या भाविक भक्तांना निवासाची सोय करण्याच्या नावाखाली लॉज-भक्त निवास देण्याच्या नावाखाली आणि पूजा करण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे भाविकांची होणारी लुट थांबवावी यासाठी पुजारी मंडळाच्या वतीने कारवाईची मागणी करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

लाडकींना सरकारी लाभ सोडवेना; अपात्र लाडकींनी वळवला 'या' योजनांकडे मोर्चा

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT