वाशीममधील शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. भावना गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे. 8.26 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरण्यासाठी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचं खातं आयकर विभागाने गोठवलंय. या संस्थेतील कारभाराबाबत 19 कोटी रुपयांचा हिशोब ५ जानेवारी २०२४ पर्यंत देण्याची नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत 24 कोटी रुपयांची अफरातफर आणि त्यातून सात कोटी रुपये चोरीला गेले अशी तक्रार 12 मे 2020 रोजी त्यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिली होती. मात्र या संदर्भातील इन्कम टॅक्स भरला नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस जारी केली होती.
29 डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गवळी यांना नोटीस बजावत ५ जानेवारी २०२४ पर्यंत हिशोब मागितला होता. ५ तारखेला त्यांना या नोटीसला उत्तर द्यायचं होतं. मात्र, त्या प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांनी प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिलं होतं. त्यावर इन्कम टॅक्स विभागाचे समाधान झालं नाही. 8.26 कोटी रुपयांचा इनकम टॅक्स भरण्यासाठी अखेर भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचं खातं गोठवण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.