Bhaskar Jadhav News  Saam TV
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : कामाख्या देवीकडे 'हा' नवस मागा; शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर भास्कर जाधव यांची टीका

कामाख्या देवीला नवस करताना महाराष्ट्राच्या विकासासाठी करावा, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

रत्नागिरी : शिंदे गटातील आमदार, खासदार आज गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटावर उपरोधिक टीका करत कामाख्या देवीला राज्याच्या हितासाठी नवस करावा असं म्हटलंय.

कामाख्या देवीला नवस करताना महाराष्ट्राच्या विकासासाठी करावा, उद्योग बाहेर जाऊ नयेत आणि महाराष्ट्रातील गावे इतर राज्यात जाऊ नयेत, यासाठी नवस करावा, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. (Latest Marathi News)

शिंदे गटातील आमदारांनी यापूर्वी भाजपासोबत सत्तेत येण्यासाठी केलेला नवस पूर्ण झाला. आता त्यांनी भाजपला सत्तेतून उतरवायचा नवस करणार असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत, असं देखील भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

राष्ट्रपुरुष, शहिदांच्या अपमान करण्याच्या स्पर्धेत राज्यपाल महोदय कधीच मागे राहत नाहीत, अशी खोचक टोला त्यांनी भगत सिंह कोश्यारी यांना लगावला. यावेळी त्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या रामदेव बाबा यांच्यावरही टीका केली. रामदेव बाबा यांचे भाजपासोबत हितसंबंध आहेत, म्हणून त्यांच्या विरोधात काही केले जात नाही.जर ते भाजपाचे हितचिंतक नसते तर मात्र भाजपने संपूर्ण देशात हैदोस घातला असता.

गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीमागे भाजपचे षडयंत्र आहे का? याचा शोध घेण्याची गरज आहे अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे. आज केंद्रात आणि कर्नाटकात भाजपची सत्ता आहे आणि याचीच मस्ती व दबंगगिरी सध्या सुरू असून मराठी माणसाला एकाकी पडण्याचा भाजपाचा डाव असल्याची टीका शिवसेना नेते भास्कर जाधव केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

SCROLL FOR NEXT