डॉ.भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा झाली; परंतू कार्यकर्ते नाराज, कारण... भुषण अहिरे
महाराष्ट्र

डॉ.भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा झाली; परंतू कार्यकर्ते नाराज, कारण...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ भारती पवार (Bharti Pawar) या आज भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या.

साम टिव्ही ब्युरो

भुषण अहिरे

धुळे: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ भारती पवार (Bharti Pawar) या आज भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या जनआशीर्वाद यात्रे दरम्यान साक्री तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन मंत्री भारती पवार चर्चा करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह होता. परंतु साक्री तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरविले.

सकाळी 11 वाजता जणआशीर्वाद यात्रेसाठी पोहोचणाऱ्या मंत्री भारती पवार या संध्याकाळी साडेचार वाजता साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे पोहोचल्या त्यामुळे पुढील इतर सर्व कार्यक्रम वेळे अभावी रद्द करण्यात आले. साक्री तालुक्यातील दहीवेल येथील ऑक्सिजन प्लँटचे देखील उद्घाटन न करताच मंत्री मोहोदया मार्गस्थ झाल्याने कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

वेळे अभावी बहुतावूनश ठिकाणी मंत्री भारती पवार पोहोचल्या परंतु थोडा वेळ देऊन लगेच पुढील कार्यक्रमांना मार्गस्थ झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत नंदुरबारच्या खासदार हिना गावित यादेखील उपस्थित होत्या.

यावेळी हौशी कार्यकर्त्यांना कोरोनाचे भान उरले नसल्याचेच बघावयास मिळाले आहे. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आलेल्या भाजपच्या मंत्री महोदययांचा सत्कार करण्यासाठी सरसावलेल्या बहुतांश कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क लावले नसल्याचे बघावयास मिळाले आहे. यामुळे भाजपच्या जनसंवाद यात्रे निमित्ताने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची देखील भिती व्यक्त केली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT