Beed News Saam Tv
महाराष्ट्र

सगळं खापर केंद्र सरकारवर फोडायचं आणि स्वतः मात्र...भारती पवारांचा राज्य सरकारवर घणाघात

भाजपच्या लोकांवर राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत आहे.

विनोद जिरे

बीड - सगळं खापर केंद्र सरकारवर फोडायचं आणि स्वतः मात्र काही करायचं नाही. अशी भूमिका महाराष्ट्रात राज्य सरकारची आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वात जास्त लस दिले. आर्थिक बजेट देखील दिले. त्याच श्रेय मात्र घेतलं जातं परंतू सांगत असताना लोकांमध्ये भ्रम निर्माण केलं जात आहे, हे दुर्दैव आहे. अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांनी केली आहे. त्या बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता बोलत होत्या.

हे देखील पहा -

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भाजपच्या लोकांवर राज्य सरकार सूडबुद्धीने काम करत आहे. नारायण राणे असतील आणि इतर लोकांना त्रास देणे सुरू आहे. निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात. आम्ही कुठल्याही यशाने हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचून जात नाहीत. अशी आमची भारतीय जनता पार्टी आहे. देशसेवेसाठी जे जे करता येईल ते केंद्र सरकार काम करत आहे. राज्य सरकारने काय काय केलं हे आपण पाहतच आहात. शेतकरी प्रश्नावर राज्य सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे असे देखील त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT