BharatPe Saam TV
महाराष्ट्र

BharatPe CEO Resigns: सुहेल समीर यांनी BharatPeच्या सीईओ पदाचा दिला राजीनामा; खरं कारण आलं समोर!

भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांच्याशी समीर यांचे वाद झाले होते.

साम टिव्ही ब्युरो

BharatPe: भारतपे संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ७ जानेवारीपर्यंत ते धोरणात्मक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत. अशी माहिती भारतपेने दिली आहे. (Latest BharatPe News)

कंपनीचा व्यवसाय अधिक मजबूत व्हावा त्यामुळे सर्व भागीदारांची संमती घेत नलिन नेगी यांची भारत पेच्या सीईओ पदी नियुक्ती होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. भारतपे कंपनी आणि समीर साल २०२२ पासून वादाच्या भोवऱ्यात गुंतले आहेत. भारतपेचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांच्याशी समीर यांचे वाद झाले होते. तेव्हापासून कंपनी चर्चेत आहे.

संस्थापक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर यांनी अयोग्य भाषा वापरली तसेच कोटक ग्रुपच्या कर्मचाऱ्याला Nykaa IPO साठी निधी न मिळाल्याने धमकावले असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यामुळे याबाबत चौकशी करून दोघांची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली.

यानंतर कंपनीच्या सहसंस्थापकांनीही कंपनी सोडली होती. ग्रोव्हर कंपनीतून बाहेर पडल्यावर एप्रिलमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला. तसेच भारतपे कंपनीच्या वरिष्ठ पातळीच्या अनेक नेत्यांनी आपल्या पदाचा राजिनामा देत कंपनी सेडली होती.

अश्नीर ग्रोव्हर आणि सुहेल समीर यांच्यात नेमका काय वाद होता ?

ईटीने दिलेल्या अहवालानुसार, भारतपेचे माजी संस्थापक अश्नीर ग्रोव्हर यांनी कंपनीला पत्र लिहित सुहेल समीर यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. याच काळात कंपनी अनेक वादांच्या भोवऱ्यात अडकत चालली होती अशात समीर यांना हटवणे योग्य नसल्याचे सांगत नकार दिला होता. तसेच अश्नीर ग्रोव्हर यांना सुट्टीवर पाठवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT