Bhandardara Dam, Nagar News saam tv
महाराष्ट्र

Bhandardara Dam News : पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, भंडारदरा धरण भरले

भंडारदरा धरण परिसर हिरवेगार झाला आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar News : नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. भंडारदरा धरणाने एकूण 11 हजार 39 दशलक्ष घनफूटाची पातळी गाठली आहे. याबाबतची माहिती भंडारदरा प्रकल्पाचे अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली. (Maharashtra News)

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले आहे. यंदा पावसाच्या लहरी स्वभावाचा फटका लाभक्षेत्रासह धरणांच्या पाणलोटालाही बसला. ऑगस्टचा शेवटचा आठवडा उलटत असताना समाधानकारक पाणीसाठा असूनही जिल्ह्यातील एकही मोठे धरण अद्याप भरले नव्हते.

दरम्यान गेल्या 48 तासांपासून काही प्रमाणात वाढलेल्या पावसाने जिल्ह्यातील मोठ्या क्षमतेच्या तीन धरणांमध्ये सर्वप्रथम तुडूंब होण्याचा मान यंदाही भंडारदर्‍यालाच मिळाला आहे. भंडारदरा धरणाने आपली 11 हजार 39 दशलक्ष घनफूटाची पातळी गाठली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :जामनेर मध्ये मतमोजणी थांबवली

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT