Bhandara Saamtv
महाराष्ट्र

Shocking Crime: भरवस्तीत एका घरात देहविक्रीचा व्यवसाय, ३ महिला अन् ४ पुरूषांना 'नको त्या' स्थितीत पकडलं

Bhandara Police Crack Down on Illegal Strumpet Racket: भंडाऱ्यातील एका घरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. या छाप्यात तीन महिला आणि चार पुरुष ग्राहकांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

Bhagyashree Kamble

भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका घरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तसेच छापा टाकून पोलिसांनी तीन महिला आणि पुरूष ग्राहकांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, ते घर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वार्डातील जुन्या रेल्वे लाईनजवळील एका घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. या घरात अनैतिक धंदा सुरू होता. देहविक्रीसाठी ग्राहकांना महिला आणि तरूणी पुरविण्यात येत होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तत्काळ छापा टाकून घरात चालणाऱ्या या अनैतिक धंद्यावर कारवाई केली. या छाप्यात महिलांसह चार ग्राहक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने उपस्थित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी भंडाफोड करत आरोपींना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तसेच ज्या ठिकाणी हा अनैतिक व्यवसाय सुरू होता ते घर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नवी मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय

नवी मुंबईतील अलमो स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यवसाय सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ सापळा रचत धडक कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने त्या ठिकाणी एक डमी ग्राहक पाठवला, खात्री पटल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करून छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पा मालक आणि २ मॅनेजरला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT